Image 1
Image 2
Image 3

संविधान दिन 2025 – संविधान क्रांती मंथन महास्पर्धा | ज्ञान आणि विचारांची चाचणी

संविधान क्रांती मंथन महास्पर्धा: ज्ञानाची क्रांती, विचारांचे मंथन!

भारतीय संविधान दिन (26 नोव्हेंबर) आणि सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त (28 नोव्हेंबर), बहुजन क्रांती विचारमंच एक भव्य ऑनलाइन स्पर्धा आयोजित करत आहे. भारतीय संविधानाचे महत्त्व, धम्मज्ञान आणि सत्यशोधक बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रसार, प्रचार आणि जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

⚠️ महत्वाची सूचना: स्पर्धकांच्या मागणीनुसार परीक्षेच्या वेळेत आणि स्वरूपात बदल करण्यात आला आहे. कृपया खालील माहिती वाचा.


स्पर्धेचे नवीन स्वरूप आणि बक्षिसे

ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन आणि बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरूपाची असेल.

  • एकूण प्रश्न: 50 प्रश्न (100 गुण)
  • वेळ: 30 मिनिटे
  • भाषा: ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेत देता येईल.
  • माध्यम: मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर (वेब पोर्टल).

विजेत्यांसाठी भव्य बक्षिसे:

  • 🥇 Top 3 विजेते: ₹8000 रोख बक्षीस (UPI द्वारे) + 3 टी-शर्ट + 3 संविधान पुस्तके (गर्जना दालनतर्फे).
  • 🏆 Top 10 विजेते: "गुलामगिरी" पुस्तक (घरपोच) + ₹200 UPI कॅश.
  • 🏅 सर्व सहभागी स्पर्धक: डिजिटल प्रमाणपत्र (Digital Certificate) प्रदान केले जाईल.

स्पर्धेचा अभ्यासक्रम

स्पर्धेची तयारी करण्यासाठी खालील तीन प्रमुख विषयांवर आधारित अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे:

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म
  2. भारतीय संविधान (केवळ कलम 1 ते 300)
  3. महात्मा फुले लिखित "गुलामगिरी" हे पुस्तक

(टीप: स्पर्धेचा सविस्तर अधिकृत अभ्यासक्रम मिळवण्यासाठी येथे क्लिक करा!)


महत्वाच्या तारखा आणि वेळापत्रक (Updated)

  • प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर 2025 ( सायं. 5 वा. )
  • व्हॉट्सअॅप ग्रुप निर्मिती: 25 नोव्हेंबर 2025 (उद्या)
  • ऑनलाइन परीक्षेची तारीख: 26 नोव्हेंबर 2025
  • परीक्षेची वेळ: रात्री 8:00 वाजता सुरू (लिंक 7:50 PM ला मिळेल)
  • निकाल व बक्षीस वितरण: 28 नोव्हेंबर 2025 ( दुपारी 12 वा. )

सहभाग कसा घ्यावा आणि मुख्य नियम

  1. नोंदणी फी: स्पर्धेत सामील होण्यासाठी माफक शुल्क ₹50 आहे.
  2. नोंदणी प्रक्रिया:
  3. परीक्षा प्रक्रिया आणि रोल नंबर:
    • सर्व स्पर्धकांचे रोल नंबर (Roll Numbers) लवकरच WhatsApp ग्रुपवर आणि चॅनेलवर जाहीर केले जातील.
    • परीक्षेची लिंक, परीक्षा सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी (म्हणजेच 7:50 PM ला) WhatsApp ग्रुपवर पाठवण्यात येईल.
    • प्रत्येक स्पर्धकाला फक्त एकदाच परीक्षा देता येईल.
  4. विशेष लाईव्ह मीट (Live Meet):
    • निकालाच्या दिवशी स्पर्धकांना आयोजकांशी थेट संवाद साधण्यासाठी एका विशेष लाईव्ह मीटचे आयोजन केले आहे.
    • यामध्ये तुमचे अनुभव आणि सूचना मांडता येतील. याची लिंक निकालाच्या दिवशी दिली जाईल.
  5. संपर्क आणि अपडेट्स: वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धकांनी 'बहुजन क्रांती विचारमंच' यांचे अधिकृत WhatsApp चॅनेल जॉईन करावे. येथे क्लिक करून Join व्हा!

आजच नोंदणी करा!

या वैचारिक मंथनात सहभागी होऊन आपले ज्ञान तपासा आणि संविधानाच्या सन्मानासाठी आयोजित या उपक्रमाचा भाग व्हा.

1 Comments

  1. नेमके काय विचारणार आहे परीक्षेत सिलॅबस व्यवस्थित सांगा

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form