विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माता रमाई आंबेडकर जयंती (7 फेब्रुवारी) आणि बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी) यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त 'बहुजन क्रांती विचारमंच' यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण वैचारिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे नाव आहे — “समता क्रांती मंथन महास्पर्धा 2026”.
ही भव्य ऑनलाईन MCQ आधारित महापरीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर या महामानवांच्या समतावादी, लोकशाही आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.
"सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा केवळ गुणांपुरती मर्यादित न राहता, सामाजिक जाणीव आणि वैचारिक स्पष्टता निर्माण करणाऱ्या असाव्यात. ही स्पर्धा सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारी चळवळ ठरेल."
या परीक्षेसाठी खालील दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्ही ते खालील बटणवर क्लिक करून डाउनलोड करू शकता:
विद्यार्थी, युवक, युवती, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही परीक्षा विचार समृद्ध करणारी आणि आत्मभान जागवणारी आहे. समता, स्वराज्य आणि मानवमुक्तीच्या विचारांशी नाळ जोडण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी विलंब न करता आजच नोंदणी करावी.
महत्त्वपूर्ण सूचना: स्पर्धेबाबत जाहीर करण्यात आलेली माहिती अंतिम राहील. आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. अभ्याससाहित्य आयोजकांच्या टेलिग्राम चॅनेलवर मोफत उपलब्ध आहे.
जय भीम! जय शिवराय!
शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत वैचारिक व्यासपीठ. आम्हाला फॉलो करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
No related posts.