Bhim song LYRICS

होता भीमराव लय दिलदार

जमीन जुमला भला तो बंगला

केलाया वारसदार तुला

केलाया वारसदार

होता भीमराव लय दिलदार

तुला फुकट दिलया सार

गावकूसाच्या बाहेर होत

तुझ मोड्क तोड्क घर

त्याला सोईच नव्हत दार

वर पचाट्याच छप्पर

गळ्यात मड्क पाठिला झाडू

फिरायचा दारो दार

होता भीमराव लय दिलदार

तुला फुकट दिलया सार

नव्हत जवड बसत कोणी

नव्हत मायेच दिसत कोणी

होता असून नसल्या वाणी

नव्हत तुला रे पुसत कोणी

भले भले ते झुकतात आज

केला तुला मतदार

जेव्हा केल तुला मतदार

होता भीमराव लय दिलदार

तुला फुकट दिलया सार

आता हातात आलया फोन

आणि दारात आली गाड़ी

गाव वेशिच्या बाहेर राहयचा

आता गावात बनली माड़ी

गळ्यात सोन हातात सोन

बोटात अंगठ्या चार

तुझ्या बोटात अंगठ्या चार

होता भीमराव लय दिलदार

तुला फुकट दिलया सार

खातो भीमाची तूपवान रोटी

नाव भलत्याच घेतोय ओठी

धन बापच बसलाय दाबून

काय केलस समाजासाठी

पंगला हा सारा सुनील समाज

बस ना गाड़ी गप गार

कस बस ना गाड़ी गप गार

होता भीमराव लय दिलदार

तुला फुकट दिलया सार

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

अधिक माहितीसाठी फॉलो करा:
लिंक कॉपी झाली!
Scroll to Top