मी वादळ वारा Lyrics
खोपी कूपी सोडून साऱ्या
माड्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा,
मी वादळ वारा
मी तथागताची वाणी
मी ज्योतीबाची गाणी
मी क्रांतीचा नारा नारा,
मी क्रांतीचा नारा
मी भिम युगाचा बेटा,
मी भिम युगाचा रेटा
विषमतेला थारा तेथे
जातो माझा मारा
मी वामना वाणी गातो,
मी वामना वाणी जातो
जातो तिथे पेरित जातो
चिल्या पिल्या चारा
खोपी कूपी सोडून साऱ्या
माड्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा,
मी वादळ वारा
गायक: अनिरुद्ध वनकर