Bhim song LYRICS तुफानातले दिवे लेखक: वामनदादा कर्डक गायक: Vijayanand...
तुफानातले दिवे
आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा
मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले
अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा
जरा न खाली लवे.
हाय बिचारा दुबळा वारा
निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्याने मावळणारी
जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून
मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून
तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे,
काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले
अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,
चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड
येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,
प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी
नांदणे हेच अम्हाला हवे
तुफानातले दिवे
आम्ही तुफानातले दिवे
Vaman Dada Kardak
Bhim song LYRICS तुफानातले दिवे लेखक: वामनदादा कर्डक गायक: Vijayanand...
जय भीम माझ नाव हाय रमाई लेखक: Dilraj Pawar गायक:...
Bhim song LYRICS माझ नाव हाय रमाई लेखक: Dilraj Pawar...
समता क्रांती मंथन महास्पर्धा 2026: ऑनलाईन मोफत परीक्षा | बहुजन...