लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात Lyrics | Lay Bal Aal Lyrics

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात Lyrics | बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात Lyrics 
-------------------------------------
Album- 
Singer - मंजुषा शिंदे 
Lyricist - प्रकाश जाधव 
Music Label - 
Release Date - 
----------------------------------

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात Lyrics 

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात

बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। धृ ।।
गुर ओढणार पोरगा माझा साहेब
तहसिलेतला मोठा नायब आता झाला

त्याचा दरारा असे सरकारी नौकरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। 1 ।।

राजवाड्यातला माणूस आता गावात आला
सा-या गावचा कारभारी आमुचा येडुबा झाला

झाला सरपंच बोलाया लागला जोरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। 2 ।।

एका विहीरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया
तीथ समतेच मंदीर आता लागल्या बांधाया

नात जुळू लागल खालच्या वरच्या थरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात।। 3 ।।
भाऊ पंगतीत आता बसू लागला प्रकाश
परीवर्तनातला तो दिसू लागला विकास

भर चौकात आता नीघाया लागली वरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात... ।। 4 ।।

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात....
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात.......

*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

 आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form