संविधाननिष्ठ मूल्यांपासून दूर जात असलेली पीईएस - आंबेडकरी समाजाची एक शोकांतिका | Peoples Education Society | PES Mumbai
भारतीय सामाजिक न्यायाच्या आणि परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले. कारण शिक्षण हेच समतेचा पाया घालणारे प्रभावी साधन आहे. हीच दूरदृष्टी लक्षात घेऊन 1945 मध्ये बाबासाहेबांनी 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी ( People's Education Society )' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा मूळ उद्देश होता वंचित, शोषित, मागासवर्गीय घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि संविधानातील मूल्यांची जाणीव निर्माण करणे.
परंतु, आज या संस्थेची अवस्था पाहता ती बाबासाहेबांच्या संकल्पनेपासून दूर जात असल्याचे दिसते. लोकशाही, कायदा, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पीईएस ( Peoples Education Society ) मध्ये होण्याऐवजी त्याची विपरीत दिशा दिसून येते आहे. ही संस्था कायद्याचे पालन करणाऱ्या, संविधाननिष्ठ लोकांची असावी, अशी अपेक्षा असताना आज संस्थेच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो.
हेही वाचा: Peoples Education Society विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!
पीईएस ( Peoples Education Society ) च्या आत सध्या गट तयार झाले असून, संस्था चालविण्याऐवजी सत्तासंघर्षावर भर दिला जात आहे. संस्था चालवणाऱ्या काही व्यक्तींनी संविधान, संस्थेचा नियमावली आणि संस्थापकांचे विचार बाजूला ठेवून केवळ व्यक्तिगत हितासाठी निर्णय घेणे सुरू केले आहे. यामुळे संस्था उद्दिष्टांपासून भरकटली आहे.
शैक्षणिक संस्था ही 'ज्ञान, सत्य आणि न्याय' यांचं प्रतीक असावी, अशी अपेक्षा असताना, आज पीईएस ( Peoples Education Society ) मध्ये संस्थेचे ट्रस्टी, सदस्य आणि प्रशासन घटनात्मक तत्त्वांचे पालन करताना अपयशी ठरत आहेत. अनेक निर्णय हे केवळ एका गटाच्या स्वार्थासाठी घेतले जात असल्याने कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक यांच्यात संभ्रम व नाराजी आहे.
हेही वाचा : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिवजयंती उत्सव मध्ये सामील होतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक तत्वांची चौकट आहे. त्या चौकटीवर आधारित असलेल्या संस्थेत जर कायद्याचे पालनच होत नसेल, तर ही मोठी शोकांतिका आहे. जे स्वयं कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांच्याकडून समाजाला कायद्याचे महत्त्व समजावून सांगण्याची अपेक्षा ठेवता येईल का?
आज पीईएस ( Peoples Education Society ) मध्ये आवश्यक आहे ती एकजूट जी वैयक्तिक सत्तेसाठी नव्हे तर संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी असावी. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व हितचिंतक यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करणे ही काळाची गरज आहे. गटबाजीने संस्थेचे काहीच भले होणार नाही. सत्तेसाठीचा संघर्ष थांबवून संस्थेच्या उद्दिष्टांसाठी संघर्ष करणे हाच खराखुरा आदर्श असेल.
संस्थेची सध्याची अवस्था पाहता, एक स्पष्ट संदेश समोर येतो आज पीईएस ( Peoples Education Society ) मध्ये संघटनात्मक पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. ही पुनर्बांधणी केवळ नावापुरती नसावी, तर ती संविधानाच्या मूल्यांवर आधारित असावी. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने मग तो ट्रस्टी असो, सदस्य असो, वा प्रशासनातील अधिकारी संस्थेच्या नियमांचे, संविधानाचे आणि बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा : नैराश्यग्रस्त समाजाला राजकीय ताकदीची गरज... डॉ बाबासाहेब आंबेडकर
पीईएस वाचवूया - आदर्श शिक्षणसंस्थेसाठी लढूया
पीईएस ( People's Education Society ) ही केवळ एक शैक्षणिक संस्था नव्हे. ती सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. बाबासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा विचार रुजवायचा होता. ही संस्था जर गटबाजी, राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थाचा बळी ठरत असेल, तर ती बाबासाहेबांच्या कार्याची अवहेलना ठरेल. आपण सर्वांनी एकत्र येऊन, संस्थेच्या मूळ उद्देशांची आठवण ठेवत, पीईएस ( Peoples Education Society ) वाचवण्यासाठी संघटित होणे अत्यावश्यक आहे. कायद्याचे राज्य, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि समान संधी यांचा पुरस्कार करणारी संस्था म्हणून पीईएस ( Peoples Education Society ) पुन्हा एकदा नव्याने उभी राहू शकते यासाठी आजचा संघर्ष बाबासाहेबांप्रती खरी आदरांजली ठरेल.
- इंजि. अविनाश कांबळे, माजी विद्यार्थी पी. ई. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, मो. 8888363060
हेही वाचा
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपले गुरू का म्हटले?
- डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी करण्यात आलेला संघर्ष
- बौद्ध धम्माविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!
वरील माहिती मध्ये जर काही चुक झाली असेल तर नक्की आम्हाला E-Mail द्वारे कळवा, आम्हाला Suggestions देण्यासाठी येथे क्लिक करा!
Latest Updates साठी आम्हाला WhatsApp, Facebook, Instagram ला फॉलो आणि YouTube ला Subscribe करून Support करा! जय शिवराय जय भीम 💙🧡🙏!