Image 1
Image 2
Image 3

बहुजन क्रांती विचारमंच आयोजित 'बाबासाहेबांच्या 134 व्या जयंतीनिमित्त झालेल्या नवक्रांती मंथन महास्पर्धेतील प्रश्नोत्तरं' | Jaybhimtalk

भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बहुजन क्रांती विचारमंच तर्फे आयोजित करण्यात आलेली "नवक्रांती मंथन महास्पर्धा 2025" ही भव्य ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नाधारित (MCQ) परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून शेकडो स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तसेच फुले-शाहू-आंबेडकरी तत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पसरवणे हा होता.

या लेखामध्ये आम्ही या झालेल्या स्पर्धेतील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सादर करत आहोत. या प्रश्नोत्तरांमधून वाचकांना बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य, तसेच समाजपरिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे सखोल ज्ञान मिळेल. ही परीक्षा केवळ ज्ञानचाचणी नव्हती, तर बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाशी आत्मीय नातं जोडणारी एक विचारमंथनाची संधी होती.
चला तर मग, या लेखातून आपण त्या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांद्वारे बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांना पुन्हा उजाळा देऊ आणि त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करूया.

प्रश्न उत्तरे खालील प्रमाणे 

1] पुढीलपैकी कोणता पेशा (नोकरी) बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केलेला नाही ?

  • A) लॉ कॉलेज प्रिन्सिपॉल
  • B) सीडनहॅम कॉलेज प्रोफेसर
  • C) मुंबई हायकोर्ट जज
  • D) लॉ मिनिस्टर ब्रिटिश गवर्नमेंट

Correct Answer: C) मुंबई हायकोर्ट जज

2] "सामाजिक न्याय दिवस" कोणाच्या जयंती दिवशी साजरा करतात ?

  • A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • B) गौतम बुद्ध
  • C) छ. शाहू महाराज
  • D) महात्मा फुले

Correct Answer: C) छ. शाहू महाराज

3] डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्रजी शिक्षण कुठे झाले ?

  • A) प्रतापसिंह हायस्कूल सातारा
  • B) एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई
  • C) लष्करी शाळा महू
  • D) मराठा हायस्कूल मुंबई

Correct Answer: D) मराठा हायस्कूल मुंबई

4] भारतीय संविधानात "प्रशासकीय कारणासाठी अल्पकालीन तात्पुरती नियुक्ती" कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते ?

  • A) कलम 310 अन्वये
  • B) कलम 312 अन्वये
  • C) कलम 316 (2) अन्वये
  • D) कलम 323 A अन्वये

Correct Answer: C) कलम 316 (2) अन्वये

5] खालीलपैकी सम्राट अशोकाने वसविलेले शहर कोणते ?

  • A) मगध
  • B) श्रीनगर
  • C) मद्रास
  • D) पैठण

Correct Answer: B) श्रीनगर

6] जीवनातील दुःखातून बाहेर पडण्यासाठी गौतम बुद्धाने काय सांगितले ?

  • A) चार आर्यसत्ये
  • B) त्रिशरण
  • C) पंचशील
  • D) अष्टांग मार्ग

Correct Answer: D) अष्टांग मार्ग

7] बाबासाहेबांनी सुरू केलेल्या गिरणी कामगार लढ्याला बळ देणारे खालील सुप्रसिद्ध चळवळीचे गाणे कोणी गायले ?

  • A) गणेश मोकल
  • B) अमर शेख
  • C) श्री नारायण नागू
  • D) कॉ. ग. ल. पाटील

Correct Answer: A) गणेश मोकल

8] नुकतेच "डॉ. भिमराव आंबेडकर वसतिगृह योजना" कोणत्या राज्यसरकारने सुरू केली ?

  • अ) पंजाब
  • ब) तेलंगणा
  • क) उत्तरप्रदेश
  • ड) मध्यप्रदेश

Correct Answer: क) उत्तरप्रदेश

9] "बौद्ध अवतार माझिया अदृष्टा, मौन मुखें निष्ठा धरियेली" हा अभंग कोणी लिहिला ?

  • A) संत तुकाराम
  • B) संत नामदेव
  • C) संत चोखामेळा
  • D) संत बहिणाबाई चौधरी

Correct Answer: A) संत तुकाराम

10] भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत “Fraternity” या शब्दाचा संदर्भ कोणत्या प्रकारच्या मूल्याशी आहे?

  • A) आर्थिक समता
  • B) सांस्कृतिक एकात्मता
  • C) राष्ट्रीय एकात्मता आणि व्यक्तीगतरित्या सन्मान
  • D) राजकीय न्याय

Correct Answer: C) राष्ट्रीय एकात्मता आणि व्यक्तीगतरित्या सन्मान

11] आपल्या कवितांतून "थिअरी इज नॉट लीटरेचर" असं कोण म्हणाले ?

  • A) सुरेश भट
  • B) नामदेव ढसाळ
  • C) ज. वी. पवार
  • D) दया पवार

Correct Answer: B) नामदेव ढसाळ

12] खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला नाही.

  • A) भारतीय रिब्लिकन पक्ष
  • B) स्वतंत्र कामगार पक्ष
  • C) शेड्युल कास्ट फेडरेशन
  • D) दलीत शोषित संघर्ष समिती

Correct Answer: D) दलीत शोषित संघर्ष समिती

13] शिवरायांनी नेमलेले स्वराज्याचे निष्ठावंत सचिव/ वकील कोण होते ?

  • A) दौलत खान
  • B) रुस्तुम- ए- जमान
  • C) मदारी मेहतर
  • D) काझी हैदर

Correct Answer: D) काझी हैदर

14] भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात 'न्यायिक पुनरावलोकन' (Judicial Review) याचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे?

  • A) भाग III
  • B) भाग IV
  • C) भाग V
  • D) संविधानात असा उल्लेखच नाही

Correct Answer: A) भाग III

15] "माझा विद्रोह हा कुणाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी नव्हे तर माझ्या नरड्याला लागलेले नख काढण्यासाठी आहे" असं विद्रोही भाष्य कोणी केले ?

  • A) डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • B) कॉ. गोविंद पानसरे
  • C) अण्णाभाऊ साठे
  • D) डॉ. आ. ह. साळुंखे

Correct Answer: D) डॉ. आ. ह. साळुंखे

16] बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणारे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची ओळख कोणी करून दिली?

  • A) दादासाहेब गायकवाड
  • B) किर्लोस्कर गुरुजी
  • C) रामजी बाबा
  • D) रामचंद्र बाबाजी मोरे

Correct Answer: B) किर्लोस्कर गुरुजी

17] "जय भवानी जय शिवाजी" हा नारा सर्वप्रथम कोणी दिला ?

  • A) महात्मा फुले
  • B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • C) अण्णाभाऊ साठे
  • D) छत्रपती शाहू महाराज

Correct Answer: B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

18] शिक्षण क्षेत्रात बाबासाहेबांचे खालीलपैकी कोणते मोठे यश आहे ?

  • A) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) ची स्थापना
  • B) भारतीय साक्षरता प्रोत्साहन
  • C) शिक्षण हक्क कायद्याची ओळख
  • D) शिक्षण सांख्यिकी संस्था स्थापना

Correct Answer: C) शिक्षण हक्क कायद्याची ओळख

19] कोणत्या कलमाचा मसुदा लिहिण्यास बाबासाहेब स्वतः तयार नव्हते ?

  • A) कलम 395
  • B) कलम 379
  • C) कलम 370
  • D) कलम 307

Correct Answer: C) कलम 370

20] "देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचे गुप्त मर्म आहे..." असा उल्लेख कोणत्या लेखकाने आपल्या पुस्तकात केला ?

  • A) स्वामी विवेकानंद
  • B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • C) छत्रपती शाहू महाराज
  • D) प्रबोधनकार ठाकरे

Correct Answer: D) प्रबोधनकार ठाकरे

21] बाबासाहेबांनी संविधानाचे " हृदय आणि आत्मा " म्हणून कशाचे वर्णन केले होते ?

  • A) अधिकृत प्राथमिक हक्क संरक्षण
  • B) संवैधानिक सहमालमत्तेचा अधिकार
  • C) घटनात्मक सोयीसुविधांचा अधिकार
  • D) संसद आणि न्यायपालिका

Correct Answer: A) अधिकृत प्राथमिक हक्क संरक्षण

22] अनुसूचित जातींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संसदेत बाबासाहेबांनी कोणता महत्त्वाचा कायदा आणून समर्थन केले ?

  • A) अस्पृश्यता निवारण अधिकार
  • B) अनुसूचित जाती महासंघ विधेयक
  • C) अनुसूचित जाती हक्क व अधिनियम
  • D) अनुसूचित जाती जमाती उच्चाटन कायदा

Correct Answer: B) अनुसूचित जाती महासंघ विधेयक

23] " मला माहीत आहे समोरच्या गर्दीतला कुणीतरी माझ्यावर गोळी झाडायला टपलाय..." असे प्रतिपादन कोणी केले ?

  • A) डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • B) कॉ. गोविंद पानसरे
  • C) डॉ. कलबुर्गी
  • D) गौरी लंकेश

Correct Answer: A) डॉ. नरेंद्र दाभोलकर

24] " महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, सेनापती बापटांना... एकशे पाच अज्ञात हुतात्म्यांना, आदरे करतो मुजरा वंदना " हे गाणे कोणी लिहिले ?

  • A) शाहीर अमर शेख
  • B) अण्णाभाऊ साठे
  • C) नामदेव ढसाळ
  • D) जे. वी. पवार

Correct Answer: B) अण्णाभाऊ साठे

25] वांशिक भेदभावाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी कोणत्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • A) भारतीय हितकारणी सभा
  • B) जागतिक बौद्ध महासभा
  • C) संयुक्त राष्ट्र व्यासपीठ
  • D) जागतिक मानवी हक्क व्यासपीठ

Correct Answer: C) संयुक्त राष्ट्र व्यासपीठ

26] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे लग्ना नंतर नाव काय ठेवले ?

  • A) शारदा
  • B) सविता
  • C) माईसाहेब
  • D) रमाबाई

Correct Answer: B) सविता

27] बाबासाहेबांचे तिसरे गुरू महात्मा फुले यांनी... नवा "सार्वजनिक सत्यशोधक धर्म" कोणत्या शतकात स्थापन केला ?

  • A) 17 वे शतक
  • B) 18 वे शतक
  • C) 19 वे शतक
  • D) 20 वे शतक

Correct Answer: C) 19 वे शतक

28] 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून बाबासाहेबांनी कोणत्या विषयावर भाषण केले ?

  • A) मला बौद्ध धम्म का प्रिय आहे
  • B) माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान
  • C) ब्रिटिश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशन
  • D) भारतीय लोकशाहीचे भवितव्य

Correct Answer: B) माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान

29] सम्राट अशोक शिलालेख उलगडवण्यामागे कोणत्या इतिहास संशोधकाचा हात आहे ?

  • A) जॉन स्मिथ
  • B) रॉबर्ट विल्सन
  • C) जेम्स प्रिन्सेप
  • D) अलेक्झांडर कनिंगहॅम

Correct Answer: C) जेम्स प्रिन्सेप

30] लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कार्ल मार्क्स शेजारी कोणत्या भारतीय महामानवाची प्रतिमा आहे ?

  • A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • B) गौतम बुद्ध
  • C) महात्मा फुले
  • D) छ. शाहू महाराज

Correct Answer: A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

31] 'क्रांती आणि प्रतिक्रांती' यामध्ये बाबासाहेबांनी 'प्रतीक्रांती' ची व्याख्या काय सांगितली ?

  • A) क्रांती विरोधातील ब्राह्मण धर्माचा मार्ग
  • B) बौद्ध धम्माचा उदय
  • C) पुनश्चः धर्मांतर
  • D) ब्राम्हण धर्मविरोधात चळवळ

Correct Answer: A) क्रांती विरोधातील ब्राह्मण धर्माचा मार्ग

32] पुढीलपैकी कोणती विदेशी भाषा बाबासाहेबांनी बालपणीच शिकून घेतली होती ?

  • A) फ्रेंच
  • B) पर्शियन
  • C) जर्मन
  • D) रशियन

Correct Answer: B) पर्शियन

33] "हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर!" अशी घोषणा देत बुद्धजयंती गावागावांत साजरी करा म्हणणारे... व्यक्तिमत्व कोण ?

  • A) सम्राट अशोक
  • B) नामदेव ढसाळ
  • C) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Correct Answer: C) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

34] मराठीत बोलताना लोकं शत्रूला म्हणतात की - “ माझा देव जागती ज्योत आहे..." या धार्मिक वाक्याचा अर्थ बाबासाहेबांनी कोणत्या भाषणात सांगितला होता ?

  • A) देहूरोड पुणे
  • B) नाशिक येवला
  • C) कामठी नागपूर
  • D) माणगाव परिषद

Correct Answer: A) देहूरोड पुणे

35] "जत्रा मे फतरा बिठाया, तिरथ बनाया पाणी। दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी " या गीताच्या ओळी कोणी लिहल्या ?

  • A) संत नामदेव
  • B) संत रविदास
  • C) संत कबीर
  • D) संत गाडगे बाबा

Correct Answer: C) संत कबीर

36] " जर विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी करत नसतील तर माझ्या नजरेत ते नपुंसक आहेत!" हे वाक्य कुणाचे ?

  • A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • B) शहीद भगतसिंग
  • C) कर्मवीर भाऊराव पाटील
  • D) महात्मा फुले

Correct Answer: B) शहीद भगतसिंग

37] गौतम बुद्धांच्या प्रिय घोड्याचे नाव काय होते ?

  • A) चेतक
  • B) मल्ल
  • C) कंथक
  • D) छन्न

Correct Answer: C) कंथक

38] बाबासाहेबांनी कोणाकडे बघत पुढील भाष्य केले होते ? "माझ्या शंभर भाषणांची ताकद शाहीरच्या एका गाण्यात आहे!"

  • A) प्र. के. अत्रे
  • B) कुसुमाग्रज
  • C) प्रल्हाद शिंदे
  • D) वामनदादा कर्डक

Correct Answer: D) वामनदादा कर्डक

39] बाबासाहेबांनी आयुष्यातील जास्त काळ कोणत्या सामाजिक मुद्द्यांसाठी अधिक लढा दिला.

  • A) भारतीय महिला हक्क
  • B) धर्मातील जातीय समानता
  • C) जातीय असमानता
  • D) समाज शैक्षिणक सुधारणा

Correct Answer: B) धर्मातील जातीय समानता

40] " बाबासाहेब आंबेडकर यात्रा दौरा" हा कोणत्या उपक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे ?

  • A) देखो अपना देश
  • B) देखो अपना समाज
  • C) परख
  • D) विकास

Correct Answer: A) देखो अपना देश

41] इ.स. 1928 मध्ये भारतात आलेल्या 'सायमन कमिशन' कडे बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणती मागणी केली होती ?

  • A) स्त्री पुरुष लिंगभेद बंद करावा.
  • B) वडिलांच्या संपत्तीत मुलाबरोबर मुलींचाही समान वाटा
  • C) वयात आलेल्या सर्व स्त्रीपुरुषांना मताधिकार मिळावा.
  • D) ब्रिटिश राजवटीचा तत्काळ अंत व्हावा.

Correct Answer: C) वयात आलेल्या सर्व स्त्रीपुरुषांना मताधिकार मिळावा.

42] गोलमेज परिषद वेळी दलीत वर्गाचा उल्लेख बाबासाहेबांनी कोणत्या शब्दांत केला होता ?

  • A) अनुसूचित (Non-Confirmist)
  • B) हरिजन (Harijan)
  • C) बहुजन (Bahujan)
  • D) अस्पृश्य (Untouchables)

Correct Answer: A) अनुसूचित (Non-Confirmist)

43] पुण्यातील' गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स' मध्ये बाबासाहेबांनी कोणत्या विषयावर भाषण दिले ?

  • A) भारतातील जाती, 1916
  • B) रानडे गांधी आणि जिना, 1943
  • C) संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य, 1939
  • D) जातीचे निर्मूलन, 1936

Correct Answer: C) संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य, 1939

44] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी OBC (इतर मागासवर्ग) प्रवर्गाला... जनगणनेची सर्वप्रथम मागणी केली. तेव्हा त्यांनी OBC ची लोकसंख्या किती सांगितली ?

  • A) 40 ते 50%
  • B) 55 ते 60%
  • C) 60 ते 70%
  • D) 70 ते 80%

Correct Answer: B) 55 ते 60%

45]... कोणते असे बौद्ध विहार आहे जे नंतर चालूनही कधी मंदिर झाले नाही ?

  • A) जगन्नाथपुरी (पुरी/ओरिसा)
  • B) उज्जैन महाकाली (उज्जैन/म. प्रदेश)
  • C) महाबोधी (गया/बिहार)
  • D) कार्ले लेणी (उरण/महाराष्ट्र)

Correct Answer: C) महाबोधी (गया/बिहार)

46]... धोरण समितीने 4 अहवाल मांडले होते. खालीलपैकी कोणता अहवाल त्यांनी मांडला नव्हता.

  • A) युद्धानंतर विस्कळीत झालेल्या योजनांची आणि अर्थव्यवस्थेची
  • B) मजूर, पाटबंधारे आणि ऊर्जा
  • C) दळणवळणाची साधने
  • D) जलविद्युत प्रकल्पांची राज्य विरूद्ध खासगी मालकी

Correct Answer: C) दळणवळणाची साधने

47] फुले दांपत्याने... 'बालहत्याप्रतिबंधक गृहात' कोणती सामाजिक मूल्ये प्रस्थापित करण्यात आली होती?

  • A) धार्मिक निष्ठा
  • B) जातीय उचनीच
  • C) मातृत्वाचा सन्मान आणि समतेचा अधिकार
  • D) परंपरेचे पालन

Correct Answer: C) मातृत्वाचा सन्मान आणि समतेचा अधिकार

48] बाबासाहेबांचे वडील कोणत्या पंथाची भक्ती करायचे ?

  • A) वारकरी पंथ
  • B) राम पंथ
  • C) कृष्ण पंथ
  • D) कबीर पंथ

Correct Answer: D) कबीर पंथ

49) कोणत्या बॉलिवूड चित्रपटात सर्वप्रथम भीमजयंती साजरी केलेला जल्लोषाचा क्षण दाखवला आहे ?

  • A) जयंती
  • B) झुंड
  • C) उतरंड
  • D) जयभीम पँथर

Correct Answer: B) झुंड

50) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले ?

  • A) मुंबई
  • B) नागपूर
  • C) दिल्ली
  • D) पुणे

Correct Answer: C) दिल्ली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form