संविधान दिना निमित्त बहुजन क्रांती विचारमंच तर्फे आयोजित करण्यात आलेली "संविधान मंथन महास्पर्धा 2025" ही भव्य ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नाधारित (MCQ) परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून शेकडो स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तसेच फुले-शाहू-आंबेडकरी तत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पसरवणे हा होता. या लेखामध्ये आम्ही या झालेल्या स्पर्धेतील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सादर करत आहोत. या प्रश्नोत्तरांमधून वाचकांना बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य, तसेच समाजपरिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे सखोल ज्ञान मिळेल. ही परीक्षा केवळ ज्ञानचाचणी नव्हती, तर बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाशी आत्मीय नातं जोडणारी एक विचारमंथनाची संधी होती.
1. पुढीलपैकी योग्य अनुक्रम ओळखा.
स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट 1947
संविधान स्वीकृती दिन - 26 नोव्हेंबर 1949
संविधान लागू दिन - 26 जानेवारी 1950
सांविधान अंमल दिन - 9 डिसेंबर 1946
Correct Answer: A] 1, 2 आणि 3 योग्य
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "संविधानाचा आत्मा" असे कशास संबोधले?
Correct Answer: B] कलम 32
3. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आवडत्या अश्वाचे (घोड्याचे) नाव काय?
Correct Answer: C] कंथक
4. पुढीलपैकी "स्वातंत्र्याचा हक्क" या मूलभूत अधिकारा प्रति अयोग्य विधान कोणते?
अ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ब) शांततेने व विनाशास्त्र एकत्र न जमण्याचा
क) अधिसंघ व संघ (सहकारी संस्था) बनविण्याचा
ड) सेनाविषयक व विद्याविषयक मानविशेष 'किताब वापरण्याचा
Correct Answer: D] 2 व 4 अयोग्य
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना ....... रोजी झाली. या समितीला संविधानाचा मसुदा फेरबदलासह पूर्णतः बनवून तयार करण्यासाठी एकूण ....... दिवसांचा कालावधी लागला. हिंदू स्त्रियांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले. परंतु संविधान सभेतील चर्च दरम्यान "युनिफॉर्म हिंदू कोड बिलास" ....... म्हणून टीका केली गेली.
Correct Answer: B] 29 ऑगस्ट 1947, 2 वर्षे 11 महिने 18 दिवस, हिंदू महिला कोड बिल
6. संसद नियम क्रमांक 209 कशा संदर्भात आहे?
Correct Answer: C] कटौती प्रस्ताव
7. ब्राम्हणांच्या खोट्या वर्णव्यवस्थेचा दाखला देण्यासाठी महात्मा फुले यांनी "गुलामगिरी' पुस्तकात कोणत्या ब्राम्हण ग्रंथाचा उल्लेख केला आहे?
Correct Answer: A] मनुसंहिता
8. भारताला प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक काळात पुढीलपैकी कोणत्या नावाने संबोधले गेले नाही?
Correct Answer: D] शालिग्राम
9. भारतीय संविधान पूर्णतः स्वीकृत करण्याआधी सुरुवातीपासून संविधान सभेच्या एकूण किती बैठका पार पडल्या?
Correct Answer: A] 11
10. भारतीय संविधानातील "संघराज्य प्रणाली" नुसार योग्य जोड्या ओळखा.
अ) भारताचा उपराष्ट्रपती - (i) सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदी नियुक्त होणारी व्यक्ती
ब) भारताचा महान्यायवादी - (ii) राष्ट्रपतीद्वारे नियुक्त भारताचा नियंत्रक
क) मंत्रीपरिषद - (iii) प्रमुखपदी पंतप्रधान असतो.
ड) भारताचा महालेखापरीक्षक - (iv) राज्यसभेचा पदसिद्ध सभापती
Correct Answer: C] अ (iv), ब (i), क (iii), ड (ii)
11. बुद्धाने सद्धम्माची व्याख्या काय सांगितली?
अ) सर्व प्राणिमात्रांविषयी करून सांगणारा
ब) माणसा- माणसांतील भेदभाव नष्ट करणारा
क) स्वातंत्र्याचा आणि अहिंसेचा लोप पावणारा
Correct Answer: D] 3 वगळून सर्व बरोबर
12. नागरिकांच्या हितासाठी भारतीय न्याय कल्पकता सांभाळून सामान अधिकार, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय कोणत्या कलमाद्वारे प्रदान करण्यात आले आहे?
Correct Answer: A] कलम 38
13. स्वर्ण सिंग समिती संदर्भात बिनचूक नसलेली विधाने ओळखा.
अ) ही समिती मूलभूत कर्तव्या संदर्भात होती.
ब) यात एकूण 1 अध्यक्ष + 11 सदस्य होते.
क) HR गोखले सचिव होते.
ड) प्रणव मुखर्जी यांचा देखील समिती मध्ये सहभाग होता.
Correct Answer: C] फक्त C आणि D
14. पुढीलपैकी कोणाची नियुक्ती थेट राज्यपालाद्वारे केली जात नाही?
Correct Answer: D] यापैकी नाही
15. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी पुस्तकाची टर उडवण्यासाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेच्या 44व्या अंकात कोणता मथळा लिहिला, ज्याला नंतर "दीनबंधू" द्वारे सडेतोड उत्तरे देण्यात आली?
Correct Answer: C] सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
16. भारतीय लोकसेवा आयोग (UNION PUBLIC SERVICE COMMISSION) या आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व भारतातील कोणत्या कायद्यानुसार झाली होती? ज्याचे स्वातंत्र्यानंतर नामांतर करण्यात आले आहे?
Correct Answer: B] भारत सरकार कायदा 1935
17. "धन्यवाद प्रस्ताव" (MOTIVE OF THANKS) या संदर्भातील अयोग्य विधान ओळखा.
Correct Answer: B] संसदेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर दिला जातो.
18. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी गृहत्याग का केला? खालीलपैकी योग्य कारण दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct Answer: B] रोहिनी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शाक्य यांच्यात कलह झाल्यामुळे
19. भारतीय संविधानानुसार "समाजकल्याण विभाग" स्वतंत्र स्थापन करण्याची गरज का भासली? त्यामागील हेतू उद्देश काय होता? योग्य पर्याय निवडा.
अ) सामान्य जनांचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठी
ब) 14 वर्षा पर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी
क) समाजातील मागास घटकांच्या उन्नतीसाठी
Correct Answer: C] केवळ 3
20. "राईट टू रिकॉल" हि संज्ञा भारतीय संविधानातील कोणती प्रक्रिया स्पष्ट करण्यात यशस्वी ठरते?
Correct Answer: C] मतदात्यांना आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीना जनमत संग्रहाद्वारे परत बोलावून घेण्याचा अधिकार
21. कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या?
Correct Answer: D] यापैकी नाही
22. योग्य जोड्यांचा गट ओळखा.
अ) वेद - (i) फक्त कल्पना आधारित साहित्य
ब) उपनिषद - (ii) ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी
क) ब्राह्मण्ये - (iii) खऱ्या जीवनमार्गास विरोध
Correct Answer: B] अ (ii), ब (iii), क- (i)
23. या पृथ्वी तलावर मनुष्याला सर्वप्रथम गुलाम बनविण्याच्या प्रथेचा उगम कुठे झाला याचे पुरावे देताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या 2 महत्वपूर्ण भू-भागांचा उल्लेख केला आहे?
Correct Answer: D] दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका
24. भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदींनुसार पुढीलपैकी कोणता प्रकार समाविष्ट नाही?
Correct Answer: B] धार्मिक आणीबाणी जेव्हा भारतातील कोणताही अल्पसंख्याक धर्म लोप पावण्याच्या मार्गावर असतो.
25. संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कशाचा समावेश नाही?
Correct Answer: C] प्रौढ मताधिकार
26. भारतीय एकता आणि एकात्मता सांभाळण्यासाठी धर्म रूढी परंपरा झुगारून देशाची राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी लागू होणारे भारतीय संविधानातील पुढीलपैकी कोणते कलम आहे?
Correct Answer: C] अनुच्छेद 51 (अ)
27. पुढीलपैकी कोणता हक्क हा कलम 21 मध्ये मनेका गांधी खटल्याने आला नाही?
Correct Answer: D] निवाऱ्याचा हक्क
28. या भाषेला भारतीय संविधानाने कलम 343 अन्वये भारत सरकारच्या शासन व्यवहार्य करण्यासाठी अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे.
Correct Answer: B] हिंदी
29. गौतम बुद्धांच्या आजोबांचे नाव काय होते?
Correct Answer: A] सिंहहनू
30. पुढील विधाने लक्षात घ्या.
अ) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पदे धारण करतील
ब) मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार असेल.
वरीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा.
Correct Answer: C] दोन्ही
31. संविधानातील पंचायती राज व्यवस्थेचा 73 व्या घटना दुरुस्तीप्रमाणे कोणते विधान योग्य आहे?
Correct Answer: ब) 11 वी अनुसूची संविधानात समाविष्ट करण्यात आली.
32. कलम 165 नुसार भाग 6 मधील कितव्या प्रकरणात "महाधिवक्ता" ची तरतूद आहे?
Correct Answer: C] प्रकरण - 2
33. सण 2018 पासून कोणत्या राज्यात महाधिवक्त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला?
Correct Answer: C] महाराष्ट्र
34. ब्राम्हण/आर्य लोक हे विदेशातून येऊन भारतात वसले आहेत हे पटवून देताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हणांच्या मुख्य देशाचा (मायभूमीचा) उल्लेख केला आहे. तो कोणता?
Correct Answer: B] इराण
35. भारतीय संविधानाचे "ओळखपत्र" असे कशास संबोधतात?
Correct Answer: C] उद्देशिका
36. खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
i) सत्तेचे विकेंद्रीकरण 4 भागात झाले आहे.
ii) विधानसभा हे खालील सभागृग असते.
iii) भारतीय संसद ही द्विगृही आहे.
iv) सर्वोच्च न्यायालय हे पूर्णपणे सर्वोच्च नाही
Correct Answer: C] 2, 3 आणि 4
37. बौद्ध धम्माचे विशेष वैशिष्ट्य काय आहे?
i) धम्म हा भिक्खू आणि उपासक दोन्ही माध्यमांत जगता येतो.
ii) धम्म हा पुनर्जन्म आणि आत्मा नाकारतो.
iii) धम्म माणसाला कसलेही कर्मकांड करायला लावत नाही.
Correct Answer: D] 1 व 3 योग्य
38. कितव्या घटना दुरुस्तीनुसार "उद्देशिका" ही भारतीय संविधानाचेच एक अंग म्हणून स्वीकारण्यात आले?
Correct Answer: D] 42 वी घटनादुरुस्ती
39. मूलभूत हक्कांमधील पुढील कोणते कलम समानतेच्या हक्कात येत नाही?
Correct Answer: A] कलम 19
40. पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
i) मुख्यमंत्र्याला पदाच्या गोपनीयतेची शपथ राज्यपाल देतात.
ii) कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती देखील मुख्यमंत्री पदासाठी निवडली जाऊ शकते.
iii) कलम 164 नुसार उपमुख्यमंत्र्याची निवड केली जाते.
iv) विधान (II) नुसार कोणत्याही सभागृहाचे 6 महिन्या पर्यंत सदस्यत्व मिळवणे बंधनकारक राहील.
Correct Answer: C] (i), (ii), (iv) बरोबर
41. भारतीय संविधान 1950 साली संपूर्ण भारतात लागू झाल्या पासून ते 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतीय संविधानात एकूण किती घटना दुरुस्त्या झाल्या आहेत?
Correct Answer: A] 106
42. भारताने संसदीय शासनप्रणाली, कॅबिनेट पद्धती आणि एक नागरिकत्व या संज्ञा ............................ देशाकडून स्वीकारल्या आहेत.
Correct Answer: D] ब्रिटन
43. जगातील पहिली भिक्खुणी कोण होती?
Correct Answer: C] महाप्रजापती
44. भारतीय संविधानातील "सामान नागरी कायदा" निगडीत पुढीलपैकी सत्य विधान कोणते?
i) सर्व जातींना समान आरक्षण
ii) आरक्षण विरहित जातीय समानता
iii) जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव होता कामा नये.
iv) वरीलपैकी सर्व
Correct Answer: C] फक्त 3 बरोबर
45. योग्य जोड्या जुळवा.
अ) इतर मागासवर्ग (OBC-3743) - (i) कलम 340
ब) अनुसूचित जाती (SC-59) - (ii) कलम 341
क) अनुसूचित जमाती (ST-47) - (iii) कलम 342
Correct Answer: B] अ- (I), ब- (II), क (III)
46. येथे राहण्याचा आपला टिकाव लागून सदासर्वदा शूद्र लोक गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करता या निढळाच्या घामाने मिळवलेल्या उत्पन्नांवर बिनधास्त मौजा मारता येतील म्हणून भटांनी काय प्रयत्न केले?
Correct Answer: C] वरीलपैकी सर्व
47. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
विधान L : कलम 20 (1) मध्ये NO DOUBLE LEOPARDY नमूद असून कोणत्याही व्यक्तीला एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा देता येणार नाही.
विधान M : कलम 20 (2) मध्ये NO EX POST FACTO LAW नमूद असून कोणत्याही व्यक्तीला अंमलात असलेल्या कायद्याने सुनावलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा देता येणार नाही.
Correct Answer: D] दोन्ही चूक
48. बुद्धाने काय नाकारले नाही?
Correct Answer: D] चित्तसाधना हे प्रथम साध्य
49. भारताचे संविधान भाग नऊ (क) हे पुढीलपैकी कशा संदर्भात आहे?
Correct Answer: A] अनुच्छेद 243-थ अन्वये घटीत केलेली स्वराज्य संस्था
50. भारत शासनाने कोणत्या अधिकृत इमारतीला "संविधान भवन" म्हणून घोषित केले आहे?
Correct Answer: D] जुनी संसद भवनाची इमारत
