या माझ्या दलित बांधवानो Lyrics
या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो
देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे
वर्षानुवर्षे हीन लेखूनिया
दूर लोटिले ज्या समाज्या
धुरा खांद्यावर मी वाहील तयाची
लावून पना प्राण माझा
विजयाच्या लावून पताका
मुक्यांना ही फोडीन वाचा
चालाया लावीन लुळे पांगळे
काळाराम मंदिर चवदार चे तळे
माणूस असुनी तुम्हा माणसांना
माणुसकीची जाणं नाही
मिंदे पणा सोड चल उठ गोवर्धन
जगण्यात या शान नाही
मुक्त बंधनातून व्हावंया
संग्राम या पुढे लढावया
तोडून सनातन रुढी चे कडे
काळाराम मंदिर चवदार चे तळे
Loading posts...
सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.
सर्व गाणी पहाLoading categories...
JayBhimTalk हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. आंबेडकरी विचार, बौद्ध तत्त्वज्ञान, सामाजिक प्रश्न आणि महत्त्वाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.