वादळी त्या अंधारी, लय जुलूम सोसला
पिढ्या पिढ्याचा शाप ज्याने ज्ञानाने बदलला

घातला घाला घटनेचा त्यांनी ज्याची सावली घृणा होती
पुण्य महूच्या मातीत एक सूर्य असा जन्मला

आई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा
कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

दिन-दुबळ्याची हाक काळजात भीम माझा

तो काळ होता वर्णवादाचा, रुढी परंपरेच्या शेकडो वर्षाचा
भेदभावाचा अस्पृश्यतेचा मनुवादाचा

भिडला त्याला एकटा हा पोरगा सुभेदाराचा
त्या साऱ्या जातीवाद्यांचा मोडला ज्याने माज

बाई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

मानवतेची समानतेची लढाई मोठी होती
लढण्यासाठी शिक्षणाचे त्यांनी एक शस्त्र घेतले हाती

शस्त्राने त्या तोडल्या जेव्हा असमानतेच्या बेड्या
हो स्वाभिमानाने जगू लागले सारे ठोकून आपली छाती

अरे रुबाबात दिमाखात जगतो आम्ही आज

बाई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

स्वतंत्र भारतापुढे एक प्रश्न उभा होता
संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता?

बुद्धिवंत ज्ञानवंतासा थोर तो विद्वान आला समोर
सुटा-बुटात एक कलम हातात घेता

त्या घटनेचा शिल्पकार झाला बाप माझा

बाई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

हरली होती माता भगिनी किरकोळ नव्हते तिला अधिकार
पदरी तिच्या चूल-मूल आणि फक्त तिचा संसार

हक्कामध्ये तिच्या उभी होती भिंत या समाजाची
त्या हिंदू कोड बिलाने केला तिच्या जीवनाचा उद्धार

आज फोडतीया डरकाळी उठवून आवाज

बाई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

वाढत होती कारखानदारी पण कामगारांचे हाल होते
दीड-दमिडीचा मोल लावून आम्हा बनवत गुलाम होते

त्या शोषितांच्या काळजात दडले ते कित्येक सवाल होते
राबत होती महिला जेव्हा तिच्या पोटात बाळ होते

आज त्याच कामगारांचा बदलला मिजाज

बाई कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा

दिन-दुबळ्याची हाक काळजात भीम माझा
कोट्याचं साज, आमचा ताज भीम माझा...

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now

नवीन अपडेट्स मिळवा!

जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.

Scroll to Top