Bapacha Kalcha Rubab Lyrics | बापाचा कालचा रुबाब | Trending Bhimgeet
Trending Bhimgeet

बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात

Writer: Eng. सचिन प्रकाश भद्रे Singer: भाग्यश्री इंगळे

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

भीमाचा दरारा लाख मोलाचा

भीमाचा दरारा लाख मोलाचा
कितिकांच्या सलतोय उरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

काल मिळतं नव्हत खाया
आज पक्वान ताटामधी

काल मिळतं नव्हत खाया
आज पक्वान ताटा मधी

कालच लाचारीच जगणं
आज फिरतोय थाटा मधी

भीमाची देणं गळ्यात सोनं
भीमाची देणं गळ्यात सोनं
कार उभी आहे आता दारात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

होता आधीचा कसा तो काळ
आता सोन्याची आली सकाळ

होता आधीचा कसा तो काळ
आता सोन्याची आली सकाळ

आधी गळ्यात होते मडके
आता पडती गळ्यात माळ

सारं जीवन गेल बदलून आता
सारं जीवन गेल बदलून आता
नाही कमी कशाची घरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

नाही नादी लागत कोणी
अस बनवलं वाघा वाणी

ओ..नाही नादी लागत कोणी
अस बनवलं वाघा वाणी

स्वाभिमानी त्या बापाची
आम्ही पोरं स्वाभिमानी

महारकी कालची गेली आता
महारकी कालची गेली आता
पोरं पदावर उच्च थरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

माझ्या भीमाच्या कायद्या मुळं
मुकाही बोलू लागला

माझ्या भीमाच्या कायद्या मुळं
मुकाही बोलू लागला

हुजुरी गेली आता
रोख ठोक बोलू लागला

सचिन लाखाला भारी लिहितोय
सचिन लाखाला भारी लिहितोय
गाणं भाग्यश्री च्या स्वरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

भीमाचा दरारा लाख मोलाचा
कितिकांच्या सलतोय उरात

माझ्या बापाचा कालचा रुबाब
आता दिसू लागला पोरात

महत्वाचे*: हे गीत माहितीच्या उद्देशाने शेअर केले आहे.

Follow us:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top