JayBhimTalk Logo
Home News Articles Buddhism Multimedia
जय भीम

माझ नाव हाय रमाई

अशिक्षित जरुर मी,

लेखू नको मज कमी

परीचय स्वतः चा..देते परीचय स्वतः चा...

माझ नाव हाय रमाई,

धनी पिता भारताचा

पतीव्रतेचा दाखला माझा,

या जन्मीचा सोबती राजा

धनी मला साजतो,

दाही दिशा गाजतो

डंका तो किर्तीचा..त्याच्या डंका तो किर्तीचा,

माझ नाव हाय रमाई,

धनी पिता भारताचा

या देशाचा नेक हा नेता,

बोद्ध जनांचा जीवन दाता

पीडित आज मानवा,

ज्ञानाचा देऊन दीवा

मर्द नव हिताचा..तो मर्द नव हिताचा,

माझ नाव हाय रमाई,

धनी पिता भारताचा

या पोलादी झुंजाराची,

आहे मी पत्नी धुरंदराची

ना कुणी या सारख

जनहिताचा म्होरका

सारथी रथाचा..ओ सारथी रथाचा,

माझ नाव हाय रमाई,

धनी पिता भारताचा

अशिक्षित जरुर मी,

लेखू नको मज कमी

माझ नाव हाय रमाई

धनी पिता भारताचा

IMP*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!
Scroll to Top