Logo
Home News Articles Books Buddhism Jaybhimtalk TV
Bhim song LYRICS

पूजा ग भिमाई आणि रमाई

जनाई ला काय, मरिआईला काय

कशाला अंबाबाई

पूजा ग भिमाई आणि रमाई

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।धृ।।

ज्याने दीनांचा सांभाळ केला

जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला

ना सटवाई ना भुवनाई

थोर ठरली ती शिवाई

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।1।।

शिक्षण घेऊन सुज्ञान येईल

ज्ञानाने ते अज्ञान जाईल

झाशीची राणी ती मर्दानी

आठवा सावित्रीबाई

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।2।।

आजवर पुजले आणि भजले

उपवास केले नवस लावले

सांगायला माय पडलं, पदरात काय पडलं

कोण कामी आली का ती आई

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।3।।

विज्ञानाच्या आजच्या युगात

कस काय येतंय सांगा अंगात

ते कर्मकांड सार थोतांड

तुडवावे तुम्ही पायी

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।4।।

धम्म बुद्धाचा जगात गोड

सवे परागा लागू द्या ओढ

खीर देऊन महान ठरली ती सुजातामाई

पूजा ग भिमाई आणि रमाई ।।5।।

जनाई ला काय, मरिआईला काय

कशाला अंबाबाई

पूजा ग भिमाई आणि रमाई

पूजा ग भिमाई आणि रमाई

IMP*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!
Scroll to Top