Bhim song LYRICS

घटनेच्या पहिल्या पानावरती

Ghatnechya Pahilya Panavarti Lyrics

सर्व जगावर ठसा उमटवला
कीर्तीचा हा प्रभाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

होती गुलामी गळ्यात दोरी
राष्ट्रगीत म्हण्या जोरी
साक्ष पुरावा देईल सारी
ती सव्वीस जानेवारी

कष्टाने पाणी माझ्या भिमानी
किनारी लावली या नाव...
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

आज तिरंगा झालं नामी
साऱ्या देशाची त्याला सलामी
कार्य भिमचा आलंय कामी
सदा ऋणी त्याचे आम्ही

देशा सांग आज नटविला
जिल्हा तालुका गाव...
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

होत विसाड पिकवल रान
विद्यापती असा विद्वान
असं देशाला दिलंय दान
ग्रंथ मौलिक संविधान...

लोकशाहीला मुजरा करती
रंक आणि ते राव...
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

काळी रात काळात ढळली
नवा प्रभा अशी उजळली
महती भीमाची जगाला कळली
भाग्य रेषा ही देशाची जुळली

देश क्रांतीच्यासाठी उत्तम
केला इथे उठाव...

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

महत्वाचे*: हे गीत फक्त माहितीसाठी आहे. यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही. काही आक्षेप असल्यास संपर्क साधावा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top