Bhim song LYRICS

काळ्या रामाचा दरवाजा

काळ्या रामाचा दरवाजा Lyrics

गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,

उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,

आघाडीवर होता जरी नवं-कोटी चा राजा,
आघाडीवर होता जरी नवं-कोटी चा राजा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

माणसास पाणी पाजा, माणसासा पाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,

इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

दार उघड रामा आता, दार उघड रामा आता,
पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा,

दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,

जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,
जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावे चाखवारे,

बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,
बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,

उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now

नवीन अपडेट्स मिळवा!

जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.

Scroll to Top