Bhim song LYRICS

कोहिनूर भारताचा Lyrics

होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा

जीवनपथास उजळे होऊनि दीपस्तंभ
प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ

उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा

पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची
सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची

बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा

ग्रंथात ग्रंथरूपी राही अमर तो आज
विष्णू कधी ना लोपे प्रगल्भ भीमराज

गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा

महत्वाचे*: हे गीत फक्त माहितीसाठी आहे. यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही. काही आक्षेप असल्यास संपर्क साधावा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top