कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले Lyrics | Kumbharapari Tu Bhima | Trending Bhimgeet
Bhim Song Lyrics

कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले लिरिक्स

Writer: Singer:

कुंभारापरी तू भीमा
समाजाला घडविले

धिक्कारुन गुलामीला
बुद्धाकडे वळविले

बावीस प्रतिज्ञेची
भीमा तू दीक्षा दिली

बुद्धाच्या विचारांची
भीमा तू भिक्षा दिली.

प्रगतीच्या शिखरावरी
आम्हाला चढविले...

जीवन उद्धरले
पाळताना पंचशीला

झोपडीच्या जागी आता
दिसू लागला बंगला.

लाचारी-गरीबीला
तूच दूर पळविले...

दरवाजे केले खुले
शिक्षणाच्या भवनाचे
दूध आम्हा पाजियले
गुरगुरत्या वाघिणीचे.

तुझ्या कष्टापायी भीमा
खूप काही मिळविले...

बुद्धाच्या धम्माने
केली लई नवलाई

धम्माकडे वळले
भीमा तुझे अनुयायी.

सर्व पोटजातीला
अमृताने जुळविले...

महत्वाचे*: हे गीत शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने शेअर केले आहे.

Follow us:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top