|| पाहा पाहा मंजुळा ||
लयास गेली युगायुगाची
हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा
माझ्या भीमरायाचा मळा ||
रानमाळ असता भीमाने
देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी
शिवार हा भिजविलास
बहरली कणसं इमानी
माणसं नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा
माझ्या भीमरायाचा मळा ||
त्रिसरणाची झडप तयाला
कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा
जाण्यासाठी भला
फिटते भ्रांती मिळते शांती
फुलते जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या
भीमरायाचा मळा ||
बोधिवृक्ष हे डुलती
कैसे बांधाबांधावरी
गोड लागते साऊलीत
या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे हि
चाखू झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या
भीमरायाचा मळा ||
कोल्हेकुई हि कुपाकुपानं
चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके
काढितो आतून
हरेन्द्रासंग धरूया दोघं
हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा
माझ्या भीमरायाचा मळा ||
गायक: विठ्ठल उमप
Loading posts...
सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.
सर्व गाणी पहाLoading categories...
जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.