Bhim song LYRICS

सरली निशा हसली उषा

सरली निशा,
हसली उषा,

आनंदल्या दाही दिशा
आनंदल्या दाही दिशा

देणगी मिळाली मानवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा

धन्य ती माता भिमाई,
पोटी आला रामजीचा लाल,

चौदा एप्रिल या दिनी,
समतेचा झाला उषःकाल

रखरखत्या उन्हामध्ये ९१ सनामध्ये
चैतामध्ये गारवा

उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा

भारतभूमीचा सुपूत्र,
जन्मला या मंगलदिनी,

फुलोरा फुलूनी आला,
दलितांच्या घरी अंगणी

निळ्या नभी निळा नवा
लाखामध्ये एक दिवा

शितल जणू चांदवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा

महू गाव सारे नाचले,
उधळीत सप्तरंग,

हर्षाने भरुनी आले
दुबळ्यांचे अंतरंग

धन्य धन्य हा जन्म
सार्थक हे दिपशाम

जीवा लागे या गोडवा
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा

सरली निशा,
हसली उषा,

आनंदल्या दाही दिशा
आनंदल्या दाही दिशा

देणगी मिळाली मानवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now

नवीन अपडेट्स मिळवा!

जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.

Scroll to Top