Ya Mazya Dalit Bandhawano Lyrics | या माझ्या दलित बांधवानो | Bhim Geet
Bhim Geet

या माझ्या दलित बांधवानो (Ya Mazya Dalit Bandhawano)

Writer: अज्ञात Singer: अज्ञात

या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो

देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे

वर्षानुवर्षे हीन लेखूनिया
दूर लोटिले ज्या समाज्या

धुरा खांद्यावर मी वाहील तयाची
लावून पना प्राण माझा

विजयाच्या लावून पताका
मुक्यांना ही फोडीन वाचा

चालाया लावीन लुळे पांगळे
काळाराम मंदिर चवदार चे तळे

माणूस असुनी तुम्हा माणसांना
माणुसकीची जाणं नाही

मिंदे पणा सोड चल उठ गोवर्धन
जगण्यात या शान नाही

मुक्त बंधनातून व्हावंया
संग्राम या पुढे लढावया

तोडून सनातन रुढी चे कडे
काळाराम मंदिर चवदार चे तळे

या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो

देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे

महत्वाचे*: हे गीत माहितीच्या उद्देशाने शेअर केले आहे.

Follow us:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top