दलाई लामांची निवड कशी केली जाते? एक अद्भुत अध्यात्मिक प्रवास | दलाई लामा | Dalai Lama

दलाई लामांची निवड कशी केली जाते? एक अद्भुत अध्यात्मिक प्रवास | दलाई लामा | Dalai Lama | दलाई लामा यांची निवड करण्याची प्रक्रिया
तिबेटी बौद्ध धर्मात "दलाई लामा" ही पदवी सर्वोच्च आध्यात्मिक गुरु व नेता मानली जाते. "दलाई" हा मंगोलियन शब्द असून त्याचा अर्थ "समुद्र" आणि "लामा" म्हणजे गुरु त्यामुळे दलाई लामा म्हणजे "अमर्याद करुणेचा गुरु". आजचे 14वे दलाई लामा तेनझिन ग्यात्सो हे संपूर्ण जगात शांततेचे, अहिंसेचे आणि करुणेचे प्रतीक मानले जातात.
पण हे पद मिळते तरी कसे? कोण निवडतो? ही प्रक्रिया कोणत्याही निवडणूक किंवा नियुक्ती सारखी नाही, तर ही एक गूढ, आध्यात्मिक आणि पारंपरिक पद्धतीने पार पडणारी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया दलाई लामा यांची निवड कशी होते, का, कधी व कोणत्या पद्धतीने केली जाते, याची सविस्तर माहिती.

दलाई लामा पदाची गरज व कारण काय आहे?

दलाई लामा हे केवळ एक बौद्ध भिक्षू नाहीत, तर ते तिबेटी बौद्ध धर्माच्या गेलुग परंपरेचे सर्वोच्च गुरु असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चार महत्त्वाचे पैलू एकत्र आलेले असतात:
  1. धर्मगुरु – तिबेटी बौद्ध धर्माचा प्रमुख अध्यात्मिक मार्गदर्शक.
  2. नेता – ऐतिहासिकदृष्ट्या ते तिबेटच्या राजकीय नेत्याच्या भूमिकेतही होते.
  3. अवतार – बौद्ध धर्मानुसार ते "अवलोकितेश्वर" या करुणेच्या बोधिसत्वाचे पुनर्जन्म मानले जातात.
  4. शांतीदूत – जागतिक पातळीवर अहिंसा व समतेचा प्रचार करणारे व्यक्तिमत्त्व.
या सगळ्यांमुळे दलाई लामा यांची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक व पवित्रतेने केली जाते.

निवडीची वेळ – कधी होते निवड?

दलाई लामा यांची निवड त्यांच्या मृत्यूनंतर किंवा महाहानिर्वाणानंतर केली जाते. कारण, बौद्ध धर्मानुसार ते पुनर्जन्म घेतात. एखाद्या दलाई लामा निधन पावल्यावर, त्यांचा पुढचा जन्म कुठे झाला आहे हे शोधून त्या बालकाला ओळखून, त्याला पुढचा दलाई लामा म्हणून घोषित केले जाते.
ही संपूर्ण प्रक्रिया कधी सुरु करायची हे गेलुग परंपरेतील वरिष्ठ भिक्षुंचा गट ठरवतो.

दलाई लामा यांची निवड कशी होते?

दलाई लामा यांची निवड करण्याची प्रक्रिया ही पारंपरिक, धार्मिक आणि आध्यात्मिक संकेतांवर आधारित आहे. ती काही टप्प्यांमध्ये पार पडते:
पूर्वसूचना आणि संकेत (Signs and Omens):
दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर काही काळात भिक्षू विविध धार्मिक संकेत पाहतात:
  •  मृत्यूच्या वेळी दलाई लामा यांच्या चेहऱ्याकडे कोणता दिशा असते?
  •  त्यांचा शरीराचा उष्ण भाग शेवटी कोणता राहतो? यावरून त्यांच्या पुनर्जन्माच्या स्थानाचा अंदाज घेतला जातो.
  •  विशेष ध्यानधारणा (Meditation) करून काही भिक्षू स्वप्नातून सूचना घेतात.
  •  Lhamo La-tso या पवित्र सरोवरात उच्च भिक्षू ध्यान करून भविष्यातील पुनर्जन्माचे दृश्य पाहतात.
संभाव्य मुलाचे शोध (Search for the Reincarnation):
  • हे संकेत वापरून काही विशिष्ट भौगोलिक क्षेत्र निवडले जाते.
  • भिक्षूंचा गट त्या भागातील घरांमध्ये जाऊन 2- 5 वर्ष वयाच्या मुलांशी संवाद साधतो.
  • त्या मुलाच्या स्वभाव, वर्तन, बोलण्याची शैली यावरून अंदाज घेतला जातो.

ओळख पटवणे (Confirmation Tests):

शोधलेल्या मुलासमोर मागील दलाई लामा यांचे कपडे, माळा, पुस्तकं आणि विविध वस्तू ठेवून त्यांना निवडायला सांगितले जाते. जर तो मुलगा नेमकी त्यांचीच वस्तू ओळखतो, तर त्याला खरा पुनर्जन्म मानतात.

तांत्रिक चाचणी व मंत्रोच्चार:

त्याचबरोबर अनेक धार्मिक अनुष्ठान, तांत्रिक विधी व ज्योतिषाच्या माध्यमातून ही ओळख निश्चित केली जाते. अखेरीस गदेन त्रिपा व पंचेन लामा या श्रेष्ठ भिक्षुंच्या मान्यतेने त्या बालकाची औपचारिक घोषणा केली जाते.

 दलाई लामा यांची औपचारिक नियुक्ती

  •  निवड झाल्यानंतर त्या मुलाला तिबेटमध्ये आणून (पूर्वी), किंवा आता भारतात, बौद्ध शिक्षण दिले जाते.
  •  त्याच्या शिक्षणामध्ये धार्मिक ग्रंथ, ध्यान, शास्त्र, तर्कशास्त्र, आणि बौद्ध तत्वज्ञान शिकवले जाते.
  •  तो बालक म्हणजे तुल्कू (Reincarnated lama) मानला जातो.
  •  मोठेपणी त्याला दलाई लामा पदाचा अधिकार मिळतो, जोवर तो तयार होईपर्यंत त्याच्या वतीने वरिष्ठ भिक्षु प्रशासन पाहतात.

पंचेन लामा यांची भूमिका

पंचेन लामा हे दलाई लामा यांच्या निवडीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दलाई लामा यांच्यानंतर पंचेन लामा हे दुसऱ्या क्रमांकाचे धर्मगुरु मानले जातात. तेच नव्या दलाई लामा यांची निवड निश्चित करण्यात प्रमुख निर्णय घेतात.
तसेच, नवे पंचेन लामा सुद्धा दलाई लामाच निवडतात यामुळे ही प्रक्रिया एकमेकांशी जोडलेली आहे.

चीन सरकार आणि दलाई लामा निवड

1959 साली चीनने तिबेटवर कब्जा केला आणि दलाई लामा भारतात निर्वासित झाले. त्यानंतर चीनने पंचेन लामा निवडण्यात हस्तक्षेप केला. त्यामुळे चीन सरकारने एक वेगळा पंचेन लामा घोषित केला, पण तो मान्य नाही.
  • आज दलाई लामा यांची पुढची निवड ही तिबेटी निर्वासित समुदाय व भारतातील धर्मशाळा येथील मुख्यालयातून केली जाईल, असा अंदाज आहे.
  • दलाई लामा स्वतः म्हणाले आहेत की, त्यांचा पुढचा जन्म भारतात होऊ शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की जर चीनने राजकीय हेतूने निवड केली, तर ती मान्य केली जाणार नाही.

निवडीत बदल – आधुनिक दृष्टिकोन

  1. आजच्या काळात काही भिक्षूंना वाटते की निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली पाहिजे.
  2.  दलाई लामा यांना याआधीच निवडायचं की नंतर हेही एक चर्चेचं कारण आहे.
  3. दलाई लामा यांनी सूचित केलं आहे की, ही पारंपरिक पुनर्जन्म प्रणाली थांबवता येऊ शकते, किंवा महिला दलाई लामा देखील असू शकतो.
दलाई लामा यांची निवड ही एक अद्भुत आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जिथे विज्ञानापेक्षा श्रद्धा, संकेत, परंपरा आणि अनुभव महत्त्वाचे असतात. ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, तिबेटी लोकांच्या अस्मितेचा भाग आहे. भविष्यात ही परंपरा टिकून राहते की बदलते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही पाहा:

वरील माहिती मध्ये जर काही चुक झाली असेल तर नक्की आम्हाला E-Mail द्वारे कळवा, आम्हाला Suggestions देण्यासाठी येथे क्लिक करा!

Latest Updates साठी आम्हाला WhatsApp, Facebook, Instagram ला फॉलो आणि YouTube ला Subscribe करून Support करा! जय शिवराय जय भीम 💙🧡🙏!

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form