Bhima Tujhya Nagarit Lyrics

भीमा तुझ्या नगरीत वावळे फिरू लागले
तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले

एक पुढं एक पळती तुकड्याच्या घासाला
एकाच्या बोकांडी एक जाती पुन्हा फासाला

चिल्ली पिल्ली मात्र भीमा तुझे मरू लागले
तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले

राखणारा राखील या भीमाचं इमान
करणारानं करून घेतलं स्वतःच कल्याण

झुरणारे तुझ्यासाठी भीमा झुरू लागले
तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले

आब्रूचे आब्रूदार उभे राहिले वेशीवर
उफणत्या आब्रूला घाव घालती राशीवर

वाऱ्याच्या लहरीने हारू हारू लागले
तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले

काही बी होऊन जाऊ दे आम्ही भीम सोडणार नाही
मरणं त्याच्यासाठी पण मागे हटणार नाही

जानरावासह तुझी करंगळी धरू लागले
तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top