6 डिसेंबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस मानला जातो. याच दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि शोषित, वंचितांचे तारणहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले, जिथे आज लाखो अनुयायी नतमस्तक होण्यासाठी येतात.
बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेत लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. तो शोक, तो आक्रोश आणि तो ऐतिहासिक निरोप आजही या फोटोंमधून जिवंत वाटतो. खालील गॅलरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचे आणि अंतिम यात्रेचे मूळ (Original) दुर्मिळ फोटो दिले आहेत. हे ऐतिहासिक क्षण तुम्ही पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
6 डिसेंबर 1956 चे Original Photos
महापरिनिर्वाण आणि अंतिम यात्रेचे दुर्मिळ ऐतिहासिक फोटो खालील गॅलरीत पहा.



