डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर विचारवंत आणि एक महान समाजसुधारक म्हणून ओळखतो. त्यांचा बहुतांश वेळ हा समाजाच्या उन्नतीसाठी, चळवळी उभारण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी कायदे बनवण्यात गेला. परंतु, या अत्यंत व्यग्र आणि संघर्षमय आयुष्यातही त्यांचे एक वैयक्तिक जीवन होते, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे आणि जवळच्या मित्रांचे एक खास स्थान होते.
या गॅलरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या कुटुंबासोबतचे—जसे की माता रमाबाई, डॉ. सविता आंबेडकर (माईसाहेब), पुत्र यशवंतराव—तसेच त्यांचे अनेक सहकारी आणि जिवलग मित्रांसोबतचे अत्यंत दुर्मिळ आणि मूळ (Original) फोटो दिले आहेत. महापुरुषाच्या आयुष्यातील हे खाजगी आणि कौटुंबिक क्षण तुम्ही पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
कौटुंबिक आणि मैत्रीचे Original Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या कुटुंबासोबतचे आणि मित्रांसोबतचे दुर्मिळ ऐतिहासिक फोटो खालील गॅलरीत पहा.



